आजचे युग टीव्ही संगणक व इंटरनेटचे असले तरी लोककथेची गोडी कमी झालेली नाही. प्राचीन काळी ही साधने उपलब्ध नव्हती, तेव्हा कथाकथन हा लोककथेचा प्रकार लोकरंजनाचे कार्य करत होता. एखाद्या जादूगाराप्रमाणे पशुपक्षी,प्राणीमात्र, देवदिकांच्या, परींच्या कथा ह्या लोकसाहित्यातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे किंवा पुढच्या पिढीकडे संक्रमित होत होत्या. म्हणूनच अतिसामान्यापासून असामान्यापर्यंत, लहानांपासून थोरापर्यंत, सुशिक्षितांपासून अशिक्षितांपासून राजापासून रंकापर्यंत, समाजातील सर्व स्तरातील लोकघटकांना कथेने भुरळ घातलेली होती.त्याचप्रमाणे लोककला सुद्धा मानवीसमूहाचे प्रतिनिधित्व करतात. मानवी लोकसमूहाचे ग्रामीण आणि नागर असे साधारणपणे दोन भाग पडतात.नागरीकरणाचा त्यातून उद्भवणाऱ्या दिखाऊ कृत्रिमपणाचा प्रभाव ग्रामीण व नागर जीवन पद्धतीत कार्यरत असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांची जीवनशैली ही निसर्गाशी इमान राखणारी असते. हे आदिम ग्रामीण लोकसमूह आपले जीवन जगत असताना जगण्याचा अंगभूत भाग म्हणून आपल्या जीवनशैलीचा जो कलात्मक अविष्कार करतात. त्याला लोककला असे म्हणतात. लोककला ही संज्ञा व्यापक आहे. जुन्या कपड्यांची गोधडी शिवण्यापासून ते हातावर मेहंदी काढण्यापर्यंत हजारो प्रकारांनी लोक जीवनाच्या कलाविष्काराची यादी करता येते. जीवनाशी संबंध असणाऱ्या कोणत्या ना कोणत्या कामाशी त्यांचा संबंध असतो. लोककथा व लोककला केवळ सांस्कृतिक वारसा नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा काना आहेत सण-उत्सव ,यात्रा-जत्र व सांस्कृतिक व पर्यटन क्षेत्रामध्ये लोककला लोककलेला वाढती मागणी आहे.लोककला लोककथा जतन केल्या तर ग्रामीण भागात रोजगार निर्मितीहोऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
Dr. Sangeeta Vitthal Salve (Sun,) studied this question.
Synapse has enriched 5 closely related papers on similar clinical questions. Consider them for comparative context: