PulseExploreJournal ClubDebatesTrendingResearchersJournals
Instagram
HomeExploreJournal ClubTrending
Synapse
⌘+K
Synapse
May 7, 2026International Journal of Novel Research and Development0 citationsOpen Access

महरषटरतल करतन परपरच गरमण अरथवयवसथवर हणऱय परणमच अभयस

BDBalaji Rambhau DivatePKProf. Dr. Sanjay Bhaskar Kadam

Key Points

  • या संशोधनाचा मुख्य उद्देश कीर्तन परंपरेच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवरच्या प्रभावाचा अभ्यास करणे आहे.
  • सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा ऐतिहासिक आढावा
  • स्थळिक खेडे आणि सार्वजनिक ठिकाणी कीर्तनांचे निरीक्षण
  • कलाकारांचे आर्थिक उत्पन्न विश्लेषण
  • किर्तनामुळे संबंधित व्यावसायिकांना उत्पन्न मिळत आहे.
  • कीर्तनकार, वादक आणि सहाय्यक कलाकारांची आर्थिक स्थिती सुधारते.
  • ग्रामीण समाजातील आनंद आणि प्रबोधन यामध्ये वाढ झाली आहे.

Abstract

गेल्या अनेक शतकांपासून महाराष्ट्राच्या धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक जडणघडणीत कीर्तनपरंपरेचे मोलाचे योगदान आहे. कीर्तनाच्या माध्यमातून विविध साधुसंतांनी, समाजप्रबोधकांनी मौखिक पद्धतीने समाजाचे प्रबोधन करून समाजावर उत्तम जीवनमूल्यांचे संस्कार केले आहेत. ग्रामीण महाराष्ट्रातील खेडे, सार्वजनिक ठिकाणे, देवळे या ठिकाणी धार्मिक उद्देशाने अशी कीर्तने होत आली आहेत. कीर्तन ही एक प्राचीन परंपरा आहे. संत नामदेव, संत तुकाराम यांपासून सुरू झालेल्या कीर्तन परंपरेचा वारसा आधुनिक महाराष्ट्रातील विविध साधुसंत, समाज प्रबोधनकार यांनी यशस्वीपणे पुढे सुरू ठेवला आहे. कीर्तन हे केवळ धार्मिक नाही तर ते मनोरंजक देखील असते. यातून लोकांना आनंद मिळतो आणि त्यांचे प्रबोधनही होते.कीर्तन या लोककलेचा ग्रामीण समाजावर ज्याप्रमाणे नैतिक परिणाम झाला, त्याचबरोबर कीर्तन परंपरेमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर अनेक प्रकारे खोलवर परिणाम झालेला दिसून येतो. कीर्तनामुळे ग्रामीण भागातील कलाकारांना आणि संबंधित व्यावसायिकांना उत्पन्नाचे साधन मिळते. कीर्तनकार, गायक, वादक (तबला, हार्मोनियम) आणि इतर सहाय्यक कलाकारांना त्यांच्या कलेतून पैसे मिळतात. त्यांची आर्थिक स्थिती सुधारते. या कलाकारांना उत्पन्नाचे साधन प्राप्त होते.

Ask AI
Helpful
Bookmark
Share
View Full Paper

Cite This Study

Divate et al. (2026) studied this question.

synapsesocial.com/papers/69fc2ba98b49bacb8b347ab6https://doi.org/10.56975/ijnrd.v11i2.312334
Ask AI
Helpful
Bookmark
Share
View Full Paper